Ind Vs Sa 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रायपूर येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दिलेले 359 धावांचे आव्हान आफ्रिकन संघाने शेवटच्या ओवर मध्ये पूर्ण केले आणि अटीतटीच्या या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने बरोबरी साधली आहे. सलामीवीर एडन मार्रक्रम दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला..
आफ्रिकेने रचला इतिहास (Ind Vs Sa 2nd ODI)
भारताने दिलेल्या 359 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीपासूनच आक्रमक क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिले. सलामीवीर क्विंटन डीकॉक हा स्वस्तात पास झाला तरी त्यानंतर एडन मार्रक्रम, कर्णधार टेंबा बाऊमा, मॅथ्यू ब्रेट्झेक, आणि डेव्हल्ड ब्रेव्हिस यांनी चांगली फलंदाजी केली. एडन मार्रक्रमने 110 धावांची शतकी खेळी केली. कॅप्टन टेम्बा बवुमा याने 46 धावांचं योगदान दिलं. मॅथ्यू ब्रिट्झके याने 68 धावा काढल्या. बेबी एबी अर्थात डेवाल्ड ब्रेव्हीस याने 34 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरसह निर्णायक 54 धावांची खेळी केली. अर्शदीप सिंह आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणा आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र संपूर्ण इलिंग दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांवर चांगलेच भारी पडलेले बघायला मिळाले. Ind Vs Sa 2nd ODI

फलंदाजांनी कमावलं गोलंदाजांनी गमावलं
दरम्यान भारतीय संघाने आज प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 358 धावांचा डोंगर धावफलकावर लावला. भारताकडून रनमशीन विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी साकारली. विराटने 102 धावा ठोकल्या. तर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड यांनी कार्यकर्तेतील पहिल्या शतक ठोकत 105 धावांची ताबडतोब खेळी खेळली. याशिवाय कर्णधार लोकेश राहुलने अखेरच्या टप्प्यात 66 धावांची केळी करत भारतीय संघाला 350 धावांचा टप्पा ओलांडून दिला. परंतु फलंदाजांची ही सर्व मेहनत अखेर वाया गेली दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचे टार्गेट पूर्ण करण्यात यश मिळवलं.











