भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कधी? लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायचे?

कसोटी मालिकेतील निराशाजनक पराभवानंतर, भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांमध्ये जोरदार प्रभाव पाडला. रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ३४९ धावा करून दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले, तर रोहित शर्माने जलदगतीने ५७ धावा करत सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
कर्णधार केएल राहुलनेही अर्धशतक झळकावून फलंदाजीला बळकटी दिली. कुलदीप यादवने गोलंदाजी विभागात सर्वात चमकदार कामगिरी केली आणि आफ्रिकन फलंदाजीचा कणा मोडून काढला.

दुसरा एकदिवसीय सामना कधी आणि कुठे होईल?

एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ३ डिसेंबर रोजी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. १-० ने आघाडीवर असलेला भारत हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिका पुनरागमनाची आशा बाळगेल.

टीम इंडियामध्ये मोठे बदल

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या मालिकेसाठी बाहेर असल्याने, केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ऋषभ पंतचे पुनरागमन संघासाठी मोठा दिलासा देणारे आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीमुळे संघाची फलंदाजी खूप मजबूत दिसते.

सामना लाईव्ह कुठे पाहायचा?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केली जात आहे. सामना दुपारी १:३० वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल. डिजिटल प्रेक्षक जिओ हॉटस्टार अॅप/वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ

भारत: केएल राहुल (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, टिळक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, रुबिन हरमन, केशव महाराज, टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, मार्को जॅनसेन, एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, प्रिनेलन सुब्रायन.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News