दुबई – भारत विरुद्ध पाकिस्तानची म२च म्हणजे क्रिकेट शौकिनांसाठी मोठी पर्वणीच. कोणत्याही सीरिजमध्ये हे दोन्ही एकतर सहज आमनेसामने येत नाहीत. मात्र आले तर ती मॅच पाहण्यासाठी जगभरातील भारतीय आणि पाकिस्तानी जंग जंग पछाडतात. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचची तिकिटं अक्षरश: काही तासांत विकली जातात. मात्र यावेळी एशिया कपमध्ये या दोन्ही संघात सामना होतेय मात्र तिकिट विक्री मात्र होताना दिसत नाहीये.
14 सप्टेंबरला एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची टीम आमनेसामने येणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचची तिकीट विक्री सुरु होऊन 24 तासांहून अधिक काळ लोटलाय. मात्र अद्यापही फारशी तिकीट विक्री झालेली नाही. याचं कारण आहे तिकीट विक्रीसाठी वापरण्यात येणारी पॅकेज सिस्टिम

पॅकेज तिकीट विक्री म्हणजे काय?
भारत आणि पाकिस्तान मॅचची तिकिटं खरेदी करणाऱ्यांना पॅकेज डीलमध्ये सात मॅचेसची तिकिटं खरेदी करावी लागतायेत. यातील सर्वात स्वस्त पॅकेज 33 हजारांचं आहे तर ब्रँड लाऊंजच्या तिकिटांची किंमत आहे 3 लाख 12 हजार रुपये.
काय आहे सात मॅचच्या तिकिटांचं पॅकेज?
या सात मॅचेसमध्ये भारत विरुद्ध युएई, भारत विरुद्ध पाकिस्तान यासाह फायनल मॅचचाही समावेश आहे. या निर्णयामुळे केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचे पाहू इच्छिणाऱ्या क्रिकेट शौकिनांना यावेळी एका मॅचच्या तिकिटासाठी सातपट पैसे खर्च करावे लागतायेत.
भारत-पाक मॅचच्या निमित्तानं इतर मॅचच्या तिकिटांची विक्री
आशिया कपचे आयोजक भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचच्या निमित्तानं इतर मॅचेसची तिकिटंही विकण्याटा प्रयत्न करताना दिसतायेत. त्यामुळेच त्यांनी सातही मॅचेसची तिकिटं खरेदी करण्याची पॅकेज योजना आणली आहे. आशिया कपमध्ये एकूण 12 मॅचेसे होणार आहेत. यातील 11 मॅचेसची तिकिटं 1200 रुपये 12 हजारांपर्यंत आहेत.
तिकिट पॅकेज पाहून निराशा झाली- क्रिकेट रसिक
अनेक चाहत्यांना भारत आणि पाकिस्तानची मॅच पाहण्याची इच्छा आहे. मात्र पॅकेजची तिकिटं खरेदी करावी लागत असल्यानं अनेकांच्या पदरी निराशा पडते आहे. मॅच जसजशी जवळ येईल त्यावेळी फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचचीच तिकिटं उपलब्ध करुन दिली जातील अशी आशा प्रेक्षकांना आहे. दुसरीकडे क्रिकेटर मात्र ही पॅकेज डील योग्य असल्याचं सांगतायेत.











