MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

India Vs England : भारताचा इंग्लंडवर ५८ वर्षांनंतर बर्मिंगहममध्ये ऐतिहासिक विजय! गिल, सिराज विजयाचे शिल्पकार

Written by:Astha Sutar
Published:
गिलच्या नेतृत्त्वाखाली संघाने फक्त विजय नाही तर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. बर्मिंगहममध्ये ५८ वर्षांनंतर पहिला विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला तब्बल ३३६ धावांनी सर्वात मोठा पराभव केला आहे.
India Vs England : भारताचा इंग्लंडवर ५८ वर्षांनंतर बर्मिंगहममध्ये ऐतिहासिक विजय! गिल, सिराज विजयाचे शिल्पकार

Indian Win second Test Match : कर्णधार शुभमन गिलच्या दोन्ही डावातील शतकांच्या जोरावर नवख्या भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडवर त्यांच्याच घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तसेच या विजयासह भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध बर्मिंगहममध्ये ५८ वर्षांनंतर पहिला विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला तब्बल ३३६ धावांनी सर्वात मोठा पराभव केला आहे.

गिल, सिराज व आकाश दीप विजयाचे शिल्पकार…

दरम्यान, भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५८७ धावांचा डोंगर उभारला, यात कर्णधार गिलने ३८७ चेंडूत ३० चौकार आणि ३ षटकारांसह २६९ धावांची तुफानी खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने १०७ चेंडूत १३ चौकारांसह ८७ धावांची खेळी केली. तर करूण नायर ३१ धावा करत बाद झाला होता. याला प्रतिउत्तर देताना इंग्लडचा संघाला सर्व बाद ४०७ धावा करता आल्या. त्यामुळ भारताला १८० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने ४२२ धावा करत डाव घोषित केला. यात केएल राहुलने ५५, गिलने १३ चौकार ८ षटकार लगावत १६१ धावांची विक्रमी खेळी केली. तर ऋषभ पंतने आक्रमक खेळी केली.

भारताचा ऐतिहासिक विजय…

भारतीय इंग्लंडला ६०८ धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताने इंग्लंडला ७० षटकांतच ऑल आऊट केलं. इंग्लंडचा संघ प्रत्युत्तरात मात्र २७१ धावांवर सर्वबाद झाला. यासह भारताने तब्बल ३३६ धावांनी विक्रमी विजयाची नोंद केली. इग्लंडकडून फक्त जेमी स्मिथ ८८ धावांची खेळी करू शकला. तर ब्रायडन कार्स ३८ धावा करू शकला. शुभमन गिलने एका सामन्यात ४३० धावा केल्या, तर आकाश दीपने एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तर मोहम्मद सिराजने ७ विकेट्स घेतल्या.