MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

अरेरे! अजिंक्य राहणेची फटकेबाजी व्यर्थ, केकेआरचा निसटता पराभव

Written by:Astha Sutar
Published:
केकेआरला शेवटच्या षटकात 24 धावांची गरज होती. हर्षत राणा आणि रिंकू सिंग हे मैदानात होते. त्यामुळे ते समाना खेचून आणतील अन् अशक्य वाटणारे 238 धावांचे लक्ष गाठतील, अशीच अपेक्षा होती.
अरेरे! अजिंक्य राहणेची फटकेबाजी व्यर्थ, केकेआरचा निसटता पराभव

Ajinkya Rahane

कोलकता : इंडियन प्रमियर लीगमध्ये आज (मंगळवारी) कोलकत्ता नाईट रायर्डस (केकेआर) आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामान्यात अवघ्या चार धावांनी केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला. 35 चेंडूत दोन सिक्स आणि आठ फोरच्या मदतीने 61 धावांची अजिंक्य राहणेची कर्णधारपदाला साजेशी खेळी व्यर्थ गेली.

रामदीप सिंग, आंद्रे रसल केकेआरच्या या फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. त्यामुळे केकेआरला लखनौ विरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. लखनौच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 238 धावांचा डोंगर रचला होता.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौकडून मिचेल मार्श याने धडाकेबाज फलंदाजी करताना अवघ्या 48 चेंडीत 81 धावांची वादळी खेळी केली. या खेळीमध्ये त्याने तब्बल पाच उत्तुंग षटकार लगावले. तर, त्याल निकोलस पूरनने मोठी साथ दिली. पूरनने अवघ्या 36 चेंडूत आठ सिक्सच्या मदतीने 87 धावांची वादळी खेळी केली. पुरन आणि मार्शमध्ये झालेल्या पार्टनरशिपच्या जोरावर लखनौला 238 धावांचा डोंगर रचता आला.

केकेआरची धडाकेबाज सुरुवात

239 धावांचे मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या केकआरची सुरुवात देखील धडाकेबाज झाली. सुनील नरेन याने 13 चेंडूत 40 धावा केल्या. सलामी फलंजदाज डिकाॅक लवकर परतला मात्र त्यानंतर आलेल्या कर्णधार अजिंक्य राहणे याने नरेनला साथीला घेत आक्रमक फलंदाजी कायम ठेवली.

राहणे परतला अन् सामना फिरला

अजिंक्य राहणे यांने अवघ्या अवघ्या 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो 61 धावांवर असताना शार्दुल ठाकूर याने त्याला निकोलस पूरनकडे झेलबाद करून सामन्याचे चित्र पालटवले. ठाकूरने धोकादायक रसेल याला देखील बाद करून सामना लखनौच्या बाजुने वळवला.

शेवटच्या षटकात टोलेबाजी

केकेआरला शेवटच्या षटकात 24 धावांची गरज होती. हर्षत राणा आणि रिंकू सिंग हे मैदानात होते. त्यामुळे ते समाना खेचून आणतील अन् अशक्य वाटणारे 238 धावांचे लक्ष गाठतील, अशीच अपेक्षा केकेआरच्या समर्थकांना होती. मात्र, 24 धावांची आवश्यकता असताना रिंकू आणि राणाला अवघ्या 19 धावा करता आल्या त्यामुळे अवघ्या चार धावांनी लखनौने विजय मिळवला.