IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता आज आमनेसामने, कोण होईल विजयी?

Rohit Shinde

दिल्ली: आयपीएलचे साखळी सामने आता अंतिम टप्प्यात आले आहेत. आयपीएल 2025 च्या मोसमातील 48 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता क्नाईट रायडर्स या संघांमध्ये खेळला जाणार आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल. विशेष म्हणजे आपलं प्ले ऑफ्सच तिकीट पक्कं करण्यासाठी दिल्लीला विजय महत्वाचा आहे. तर कोलकाता संघाला आपलं आव्हान टीकवून ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे.

दिल्ली की कोलकाता कोण जिंकेल?

दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे.  संघाने या सीझनमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले असून पैकी 6 सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे. त्यामुळे सध्या दिल्ली कॅपिटल्स आयपीएल गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. संघाचा नेट रन रेट सध्या +4.8 आहे. आयपीएलमधील इतर संघांशी तुलना केली असता दिल्ली कॅपिटल्स आजच्या घडीला सर्वात सरस ठरत आहे. दुसरीकडे कोलकाता क्नाईट रायडर्सची कामगिरी या सीझनमध्ये सुमार राहिली आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी अवघ्या 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. नेट रन रेटदेखील अगदीच घसरलेला असून संघ गुणतालिकेत सध्या सातव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे दोन्ही संघातील आधीचा इतिहास विचारात घेतला असता लक्षात येते की, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या 34 सामन्यांपैकी कोलकाता क्नाईट रायडर्सने 18  तर 15  सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवता आला आहे, ही बाब कोलकाता क्नाईट रायडर्सच्या पथ्यावर पडणारी अशीच आहे. अंदाजानुसार आजचा सामना दिल्ली कॅपिटल्स जिंकण्याची अधिक शक्यता आहे.

दोन्ही संघाचे प्लेयिंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स

 अक्षर पटेल (कॅप्टन), अभिषेक पोरेल, फाफ डुप्लेसी, करुण नायर, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, मोहित शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, टी. नटराजन

कोलकाता क्नाईट रायडर्स

अजिंक्य रहाणे (कॅप्टन), क्विंटन डिकॉक, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रोवमैन पावेल, वैभव अरोड़ा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अंगकृष रघुवंशी

दोन्ही संघांतील खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असणार आहे.

 

ताज्या बातम्या