आयपीएलमध्ये आज चेन्नई वि. कोलकाता सामना, केकेआरचं आव्हान संपणार?

Rohit Shinde

आयपीएलचा सीझन सध्या रंगतदार वळणावर आहे. प्ले ऑफ्समधील स्थान निश्चित करण्यासाठी संघांकडून जंग जंग पछाडले जात आहे. आज 57 वा सामना कोलकाता क्नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर आज संध्याकाळी ठिक 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. क्रिकेट , आयपीएल रसिकांच्या नजरा या सामान्याकडे असणार आहे. कारण अनेक अर्थांनी आजचा सामना महत्वाचा आहे. कोलकाता संघाला आपलं आव्हान काय ठेवायचं असेल तर या सामन्यात विजय अत्यंत गरजेचा आहे.

कोलकाता की चेन्नई, कोण कुणावर भारी?

सामना इडन गार्डन स्टेडियममध्ये होत असल्याचा फायदा कोलकाता क्नाईट रायडर्सला नक्कीच होणार आहे. कोलकाता क्नाईट रायडर्सची कामगिरी यंदाच्या सीझनमध्ये तितकीशी लक्षवेधी राहिलेली नाही. सध्या खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 5  सामन्यांमध्ये विजय मिळवत कोलकात्याने गुणतालिकेत सहावे स्थान काय ठेवले आहे. संघाकडे 11 गुण असून 0.249 चा नेट रन रेट आहे. त्यामुळे या सीझनमध्ये कोलकात्याचा नेट रन रेट साधारण राहिलेला आहे. सामना जिंकल्यास कोलकात्याला या सीझनमधील आपले आव्हान काय ठेवणे शक्य होईल, तसेच नेट रन रेटचा पुढील काळात फायदा होईल.

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सने या सीझनमध्ये निराशा केली आहे. संघ आयपीएलमधून बाहेर पडला आहे. संघाने खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघाकडे सध्या 4 गुण असून, गुणतालिकेत संघ सध्या दहाव्या स्थानावर आहे. एम एस धोनीने नेतृत्व हाती घेतल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

आजवर आयपीएल इतिहासातील कोलकाता क्नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स मधील सामन्यांवर लक्ष टाकले असता दिसते की, शेवटच्या 31 सामन्यांपैकी चेन्नईने 19 वेळा तर कोलकात्याने 11 वेळा विजय संपादन केला आहे. या आकडेवारीत चेन्नई सुपर किंग्स सरस दिसत आहे. परंतु, इडन गार्डन मैदानातील वातावरणाचा फायदा घेत कोलकाता आजचा सामना जिंकेल असं क्रिकेट समीक्षक आणि जाणकार सांगत आहेत.

‘प्लेयिंग इलेव्हन’ पुढीलप्रमाणे

कोलकाता क्नाईट रायडर्स

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), अंगकृष रघुवंशी, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रोवमैन पॉवेल, अनुकूल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोड़ा, मनीष पांडे, मयंक मार्कंडे, रमनदीप सिंह, लवनिथ सिसोदिया, चेतन सकारिया, एनरिक नॉर्किया

चेन्नई सुपर किंग्स

डेवोन कॉनवे, रचिन रवींद्र , आयुष म्हात्रे, सैम करन, रवींद्र जड़ेजा, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकिपर), नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, मथीशा पथिराना

ताज्या बातम्या