MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स भिडणार, मुंबई विजयाची मालिका कायम ठेवणार?

Written by:Rohit Shinde
Published:
आयपीएलचा 50 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स विजयाची मालिका कायम राखणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स भिडणार, मुंबई विजयाची मालिका कायम ठेवणार?

जयपूर: आयपीएल 2025 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आज 50 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्स आपली विजयाची मालिका कायम राखत प्ले ऑफ्सचं तिकिट पक्कं करणार का हे पाहणं महत्वाचं असेल, तर दुसरीकडे राजस्थानने मागील सामन्यात मोठा विजय मिळवला होता, त्यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

मुंबई Vs राजस्थान, कोण जिंकणार?

आयपीएलच्या चालू सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने जोरदार कमबॅक केलं आहे. मुंबईने सलग पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या हंगामात आजवर खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये संघाने विजय संपादीत केला आहे. संघ 12 गुणांसह गुणतालिकेत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच नेट रन रेट 0.889 असल्याने याचा फायदा संघाला आगामी काळात होऊ शकतो.

राजस्थान रॉयल्ससाठी हा सिझन तितकासा चांगला राहिला नसला तरी संघाने मागील सामन्यात मोठा विजय मिळवला होता. वैभव सुर्यवंशीच्या शतकाचा जोरार हा विजय संपादीत केला होता. संघाने आयपीएलच्या या चालू हंगामात आजवर 10 सामने खेळले असून पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, 6 गुण असून संघ गुणतालिकेत सध्या 8 व्या स्थानावर आहे. नेट रन रेट वजा असल्याने संघाची प्ले ऑफ्सची दारे आधीच बंद झाली आहेत.

दोन्ही संघाचा या आधीचा इतिहास पाहिला असता लक्षात येते की, शेवटच्या 30 सामन्यांपैकी मुंबई संघाने 15 तर राजस्थान रॉयल्सने 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा इतिहास अटीतटीचा दिसत आहे. असे असले तरी आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचं पारडं जड मानलं जात आहे.

प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोण कोण?

मुंबई इंडियन्स

रयान रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जैक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सैंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथुर

राजस्थान रॉयल्स

यशस्वी जायसवाल, रियान पराग (कॅप्टन), नीतीश राणा, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदु हसारंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्ष्णा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, कुमार कार्तिकेय