लखनौ ः सुमार कामगिरीमुळे चिंतेत असलेल्या चैन्नई सूपर किंग्जसाठी आजचा लखनौ सुपर जायंट्स विरोधातील सामना महत्त्तवाचा आहे. लखनौतील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात टाॅस जिंकून चेन्नईने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम बॅटींग करणाऱ्या लखनौने 166 रन्स करत चैन्नईला 167 रन्सचे टार्गेट दिले. मात्र शिवम दुबेच्या43 रन्स आणि महेंद्र सिंगच्या 26 रन्सच्या जोरावर चेन्नईने हे टार्गेट पाच विकेट राखून पूर्ण केले.
मागील काही सामन्यांमध्ये अपयशी ठरलेला लखनौनचा कॅप्टन ऋषभ पंत 63 रन्सची खेळी करून चैन्नईला टप्पा पार करून दिला. 49 बाॅल्सचा सामना करून चार फोर आणि चार ऋषभने आपली ही खेळी साखरली. लखनौकडून मिशेल मार्श 30 आणि आयुष बदोनी 22 धाव करत संघाला 150 चा टप्पा पार करण्यास मदत केली.

कर्णधार धोनी फाॅर्ममध्ये
आपल्या कल्पक खेळीमुळे मैदान गाजवणारा महेंद्रसिंग धोनी आज पुन्हा त्याच रुपात दिसला. धोकादायक निकोलस पूरन अंशुल कंबोच्या बाॅल्सवर एलबीडब्लूचा झाला होता. मात्र पंचांनी त्याला नाबाद ठरवेल तेव्हा धोनीने डीआरएस घेत आपला निर्णय अचूक असल्याचे दाखवून दिले. तर आयुष बदोनीला रवींद्र जडेच्या बाॅलिंगवर स्टंपिंग करत बाहेरचा रस्ता दाखवला. तर पथरनाच्या बाॅलिंगवर ऋषभ पंतचा झेल कॅच पकडला. तसेच बॅटींगमध्ये देखील 11 बाॅल्समध्ये 26 रन्स केल्या.
Chania Super king Win
रविंद्र जडेचा चमकला
चैन्नईचा स्पीनर, वाॅलराऊंडर रवींद्र जडेच्या या सामन्यात चमकला. त्याने तीन ओव्हरमध्ये 24 रन्स देत दोन बॅटीर आऊट केले. तर पथिरना याने देखील 45 रन्सच्या बदल्यात दोन जणांना आऊट केले. खलीली अहमद आणि कंबोजला प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.











