Rohit Sharma : रोहित शर्माचा भीम पराक्रम; ऑस्ट्रेलियाच्या भूमीत केला सर्वात मोठा रेकॉर्ड

रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात 1000 धावा करणारा इतिहासातील पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या कठीण परिस्थितीत, आणि फलंदाजांचा कर्दनकाळ असलेल्या बॉलर्स समोर अशी कामगिरी करत रोहितने मोठा माईलस्टोन गाठला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठा भीमपराक्रम केला आहे. रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात 1000 धावा करणारा इतिहासातील पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या कठीण परिस्थितीत, आणि फलंदाजांचा कर्दनकाळ असलेल्या बॉलर्स समोर अशी कामगिरी करत रोहितने मोठा माईलस्टोन गाठला आहे.

रोहितची टिच्चून फलंदाजी – Rohit Sharma

पर्थ मधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या आठ धावांवर बाद झालेला रोहित आज ऍडलेटमध्ये मात्र पूर्णपणे लईत दिसला. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाची भेदक गोलंदाजी रोहितने व्यवस्थित खेळून काढली आणि नंतर आपला नेहमीचा खेळ सुरू केला. रोहितने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 73 धावा काढल्या. यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकाराचा समावेश आहे. या खेळीदरम्यान तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात 1000 धावा करणारा इतिहासातील पहिला भारतीय फलंदाज बनला. रोहित हा नेहमीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फार्मात असतो. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार अर्धशतके आणि दोन शतके देखील केली आहेत. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये 804 एकदिवसीय धावा काढल्या आहेत. तो 1000 धावांपर्यंत पोहोचण्यापासून 196 धावा दूर आहे.

षटकारांचा रेकॉर्ड तोडण्याची संधी

रोहित शर्माला एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर करण्याची मोठी संधी आहे. 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या पाकिस्ताच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने 351 षटकार मारले आहेत. रोहितच्या नावावर सध्या 344 षटकार आहेत. अशावेळी शाहिद आफ्रिदीला मागे टाकण्यासाठी रोहितला आणखी 8 षटकारांची गरज आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News