Rohit Sharma : रोहित शर्मा बनला सिक्सर किंग; शाहिद आफ्रिदीला मागे टाकत रचला इतिहास 

Asavari Khedekar Burumbadkar

Rohit Sharma : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे. वनडे क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू रोहित शर्मा बनला आहे. त्याने आज पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मागे टाकत हा कारनामा केला. आजच्या सामन्यापूर्वी रोहित हा पराक्रम करण्यापासून तीन षटकार दूर होता. आज त्याने आफ्रिकन बॉलर्सची पिसे काढत ३ खणखणीत षटकार ठोकले आणि सार्वधिक सिक्स मारणारा जगातील एकमेव खेळाडू ठरला.

५७ धावांची आक्रमक खेळी – Rohit Sharma

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार फलंदाजी केली. रोहितला सुरुवातीलाच जीवदान मिळालं ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. आज रोहितने ५१ चेंडूत ५७ धावांची आक्रमक खेळी खेळली. या खेळी दरम्यान रोहितने ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण ३५१ षटकार मारले आहेत, परंतु रोहितने आता या फॉरमॅटमध्ये ३५२ षटकार मारत आफ्रिदीचा रेकॉर्ड तोडला.

कोहली सुद्धा फॉर्मात

दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नांद्रे बर्गरने यशस्वी जयस्वालला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. यशस्वीने जलद सुरुवात केली होती, पण तो वेग राखू शकला नाही आणि तो झेलबाद झाला. यानंतर रोहितने (Rohit Sharma) कोहलीसोबत डावाची सूत्रे हाती घेतली. विराट आणि रोहितने आक्रमक खेळ केला. कधी नव्हे तर विराट कोहली सुद्धा आज वेगळ्याच अंदाजात दिसला. कोहलीने तब्बल ५ सिक्स मारले असून अजूनही तो खेळत आहे. तर रोहित मात्र बाद झाला. मार्को जॅन्सनने त्याला एलबीडब्ल्यू बाद करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

ताज्या बातम्या