Rohit Sharma : वरिष्ठ खेळाडूंचा उल्लेख करत रोहित शर्माचे मोठे विधान; म्हणाला की त्यावेळी आम्हाला…

मी जेव्हा सुरूवातीला संघात आलो होतो, तेव्हा वरिष्ठ खेळाडूंनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं होतं. आता ती जबाबदारी आमची आहे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून विजय मिळवला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा दमदार खेळ बघायला मिळाला. रोहित शर्माने एकदिवसीय कारकिर्दीतील त्याचे 33 वे शतक ठोकले तर विराट कोहलीने सुद्धा अर्धशतकी खेळी केली.  रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी रोहित शर्माने एक मोठ विधान केलं.

काय म्हणाला रोहित ? Rohit Sharma

ऑस्ट्रेलियात खेळताना नेहमीच कठीण परिस्थिती असते आणि दर्जेदार गोलंदाजांचा सामना करावा लागतो. त्यामुळे परिस्थिती समजून घेत सर्वोत्तम प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. बराच काळ मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो नव्हतो, पण चांगली तयारी केली होती. त्यामुळे मालिकेसाठी येण्यापूर्वी थोडा आत्मविश्वास होता. मालिका जिंकता आली नाही, पण अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. हा तरुण संघ आहे, त्यांना या मालिकेतून बरेच धडे मिळतील.

मी जेव्हा सुरूवातीला संघात आलो होतो, तेव्हा वरिष्ठ खेळाडूंनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं होतं. आता ती जबाबदारी आमची आहे. ऑस्ट्रेलियात खेळणं कधीच सोपं नसतं, परदेशात क्रिकेट खेळणं कठीण राहिलं आहे. त्यामुळे आमचा अनुभव तरुण खेळाडूंशी शेअर करून त्यांना स्वतःचा गेम प्लॅन तयार करायला मदत करणं गरजेचं आहे,” असं रोहित म्हणाला. (Rohit Sharma)

सिडनी मध्ये रो- को ची कमाल

दरम्यान, दरम्यान, आज,सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या फॉर्मात दिसले. रोहित शर्माने १२५ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह १२१ धावांची शानदार खेळी केली. तर दुसरीकडे विराट कोहलीने सुद्धा ८१ चेंडूत ७४ धावा ठोकल्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना अशी मोठी भागीदारी करताना बघून भारतीय क्रिकेट प्रेमींच्या डोळ्याचं पारणे फिटलं.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News