रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma Virat Kohli) … भारतीय क्रिकेटचे दोन मजबूत आधारस्तंभ दोन अनमोल रत्न… मात्र याच 2 रत्नांची किंमत भारतीय निवड समितीला आहे की नाही अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे. भारतीय क्रिकेट निवड समितीने अचानकपणे रोहित शर्माचे एकदिवसीय सामन्यातील कर्णधारपद काढलं आणि शुभमन गिल ला भारताचा नवा वनडे कर्णधार केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत शुभमन गिल हाच भारताचा एकदिवसीय सामन्यातील कर्णधार असेल. निवड समितीच्या या निर्णयानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता रोहित शर्मा 2017 च्या वर्ल्डकप मध्ये असेल की नाही?? अशी शंका चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या एका वक्तव्याने संपूर्ण भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
रोहित- विराट 2027 चा वर्ल्डकप खेळणार नाहीत?? Rohit Sharma Virat Kohli
आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित आगरकरला रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या 2027 च्या विश्वचषक स्पर्धेतील संभाव्य सहभागा विषयी विचारण्यात आले. यावर उत्तर देताना अजित आगरकरने दोन्ही खेळाडूंच्या संघातील स्थानाची गॅरंटी दिली नाही. अजित आगरकरने रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma Virat Kohli) यांच्या वर्ल्ड कप 2027 मध्ये भाग घेण्यावर मोठं वक्तव्य करत म्हटलं की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे वर्ल्ड कप 2027 खेळण्याबाबत नॉन कमिटेड आहेत. अजित आगरकरांच्या या वक्तव्यावरून अशी शंका उपस्थित केली जातेय की रोहित शर्मा आणि विराट कोहली वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळताना दिसणार नाहीत. दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.

रोहितचे कर्णधारपद का काढलं? Rohit Sharma
रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय आमच्यासाठी सोप्पा नव्हता. रोहितने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसती, तरीही त्याचे (Rohit Sharma) कर्णधारपद काढणे एक कठीण निर्णय ठरला असता. परंतु आम्हाला भविष्याचा विचार करावा लागतो. भारतीय संघ सध्या संघ कोणच्या स्थितीत आहे आणि संघाला काय हवे आहे ते पहावे लागते. 2027 च्या विश्वचषकापूर्वी आम्हाला कर्णधार बदलायचा होता, आमच्या सर्वांचा तोच दृष्टिकोन होता. त्यामुळे रोहित शर्माचे कर्णधारपद काढून ते शुभमन गिलकडे सोपवण्यात आल्याचे अजित आगरकर यांनी सांगितले.
गिलला वेळ देणे आवश्यक
अजित आगरकर पुढे म्हणाले की, शुभमन गिलला एकदिवसीय क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून स्वतःला विकसित करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. एखाद्या वेळी, तुम्हाला पुढील विश्वचषकाचा विचार करावा लागतो आणि हा फॉरमॅट आता फार क्वचितच खेळला जातो. त्यामुळे, पुढच्या कर्णधाराला देण्यासाठी फारसे सामने नाहीत. त्याला तयारी आणि रणनीती आखण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. जेणेकरून तो २०२७ साठी तयारी करू शकेल असे अजित आगरकर यांनी स्पष्ट केले.











