Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माकडे पुन्हा एकदा टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामागचे कारणही तितकच महत्त्वाचे आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार शुभमन गिलचा सहभाग निश्चित मानला जात नाही. त्यातच उपकर्णधार श्रेयश अय्यर हा सुद्धा दुखापतीने या दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कर्णधारपद कोणाकडे सोपवायचे या विचारात बीसीसीआय आहे. अशावेळी पुन्हा रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडू शकते असं बोलले जात आहे.
रोहितच्या निर्णयाकडे लक्ष्य (Rohit Sharma)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व एका अनुभवी खेळाडूने करावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने रोहित शर्मासोबतचर्चा केल्याचेही बोलले जात आहे. परंतु रोहितने अद्याप कर्णधार पद स्वीकारण्यास होकार दिलेला नाही. कदाचित ज्याप्रकारे रोहितचे कर्णधारपद काढून घेण्यात आलं होते ते बघता रोहित पुन्हा कर्णधार होण्यास उत्सुक असेल असं वाटत नाही. परंतु भारतीय क्रिकेट प्रेमीचे लक्ष रोहित शर्माच्या निर्णयाकडे लागले आहे. रोहितने पुन्हा कर्णधारपद स्वीकारलं तर त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट असेल

के एल राहूलचा पर्याय
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलला सर्वात मजबूत कर्णधार पर्याय मानला आहे. केएल राहुलने यापूर्वी अनेक वेळा भारताचे नेतृत्व केले आहे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये उपकर्णधार म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे, जर रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारले नाही, तर त्याच्या जागी के एल राहुलला कर्णधारपद दिले जाऊ शकते.











