भारतीय महिला क्रिकेट संघाने वुमेन्स वर्ल्ड कप 2025 जिंकून भारताचे नाव जगभरात उजळवले आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना हिच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक देशभरात होत आहे. पण आता ती केवळ क्रिकेटमुळे नव्हे, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती मंधाना लवकरच प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी लग्न करणार (Smriti Mandhana Marriage) आहे. हे लग्न 20 नोव्हेंबर 2025 रोजी तिच्या मूळ गावी सांगली येथे होणार आहे. सांगली हेच ठिकाण आहे जिथे स्मृती वाढली, त्यामुळे हा सोहळा तिच्यासाठी खास ठरणार आहे.
2024 मध्ये नात्याची कबुली ( Smriti Mandhana Marriage)
27 वर्षीय स्मृती आणि 29 वर्षीय पलाश यांनी 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. दोघांमध्ये दोन वर्षांचे वयाचे अंतर असले तरी, दोघांचे परस्पर समजूतदारपणा आणि जिव्हाळा यामुळे त्यांचे नाते अधिक दृढ झाले आहे. पलाश मुच्छल हे केवळ संगीतकारच नाहीत तर एक चित्रपट निर्माता देखील आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय बॉलिवूड गाणी कंपोज केली आहेत. ते सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांचे भाऊ आहेत, ज्यांनी सलमान खान, ऋतिक रोशन आणि इतर बॉलिवूड अभिनेत्यांच्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. (Smriti Mandhana Marriage)

पलाश किती श्रीमंत?
अहवालांनुसार, पलाश मुच्छल यांची एकूण संपत्ती सुमारे 20 ते 41 कोटी रुपये आहे, तर पलक मुच्छलची संपत्ती 20 ते 50 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. पलकचे पती मिथुन हे देखील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक असून बॉलिवूडमध्ये त्यांचे नाव विशेष मानले जाते. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पलाश आणि त्याची बहीण पलक यांनी सोशल मीडियावरून स्मृतीचे अभिनंदन केले आणि तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन क्षेत्रांना जोडणारे स्मृती आणि पलाशचे हे नाते आता लग्नबंधनातून अधिक मजबूत होणार असून, हा सोहळा निश्चितच देशभरात चर्चेचा विषय ठरणार आहे.











