Smriti Mandhana Wedding Cancelled : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल आणि यांचे लग्न अखेर कायमचं मोडल आहे. स्वतः स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. यानंतर पलाश मुच्छलने सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच खोटी आणि बदनामी करणारी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात माझी टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे असे पलाशने म्हटल आहे.
काय म्हणाला पलाश मुच्छल (Smriti Mandhana Wedding Cancelled)
मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या, आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरं जाईन. आपण समाज म्हणून, कोणाच्याही बदनामीच्या अफवा किंवा न पडताळलेल्या गोष्टी ऐकून त्याचा न्याय करण्याआधी थोडा थांबायला शिकलं पाहिजे, अशी खरी इच्छा आहे.

आपले शब्द कोणाला किती खोल जखम करू शकतात, हे आपल्याला कधी कधी समजतही नाही. आपण या गोष्टींबद्दल विचार करत असतानाच, जगात अजून अनेक लोक मोठ्या अडचणींना सामोरं जात आहेत. खोटी आणि बदनामी करणारी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात माझी टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे. या कठीण काळात ज्यांनी माझ्या सोबत उभं राहून माझ्यावर प्रेम आणि आपुलकी दाखवली, त्या सर्वांचे मनापासून आभार. Smriti Mandhana Wedding Cancelled
स्मृतीशी पोस्ट काय ?
दरम्यान स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचे जाहीर केलं. ती म्हणाली, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल बरीच चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू आहेत, आणि मला वाटते की आता या विषयी बोलणे आवश्यक आहे. मी खूप खाजगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि तसेच राहू इच्छिते, पण मला हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे. मी ही गोष्ट इथेच संपवू इच्छिते आणि आपण सर्वांनीही हीच विनंती आहे. कृपया दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या पद्धतीने, हे सगळं सामावून घेण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक तेवढी जागा द्या. मला विश्वास आहे की आपल्या सर्वांना आणि माझ्यासाठी नेहमीच सर्वोच्च पातळीवर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा एक उच्च उद्देश आहे. मला आशा आहे की मी शक्य तितक्या काळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन आणि माझे लक्ष नेहमीच तिथेच राहील.तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. पुढे जाण्याची वेळ आली आहे’.











