Smriti Mandhana Wedding Cancelled : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल आणि यांचे लग्न अखेर कायमचं मोडल आहे. स्वतः स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. स्मृतीने पलाशसोबतच लग्न का मोडलं याबाबत कोणतेही कारण अद्याप सांगितलेलं नाही. परंतु अचानक लग्न मोडल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
स्मृती मानधना काय म्हणाली? Smriti Mandhana Wedding Cancelled
स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल बरीच चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू आहेत, आणि मला वाटते की आता या विषयी बोलणे आवश्यक आहे. मी खूप खाजगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि तसेच राहू इच्छिते, पण मला हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे. मी ही गोष्ट इथेच संपवू इच्छिते आणि आपण सर्वांनीही हीच विनंती आहे. कृपया दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या पद्धतीने, हे सगळं सामावून घेण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक तेवढी जागा द्या. मला विश्वास आहे की आपल्या सर्वांना आणि माझ्यासाठी नेहमीच सर्वोच्च पातळीवर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा एक उच्च उद्देश आहे. मला आशा आहे की मी शक्य तितक्या काळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन आणि माझे लक्ष नेहमीच तिथेच राहील.तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. पुढे जाण्याची वेळ आली आहे’. Smriti Mandhana Wedding Cancelled

पलाशचे आक्षेपार्ह स्क्रीन शॉट झाले होते viral –
खर तर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणारे होते. त्यासाठी मोठी तयारी ही करण्यात आली होती. अगदी हळदीचा कार्यक्रमही झाला होता. स्मृती आणि पलाशच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि मोठी खळबळ उडाली.वडिलांची तब्येत खराब झाल्याने स्मृतीने लग्न पुढे ढकललं होतं. मात्र याच दरम्यान पलाश मुच्छल याचे काही धक्कादायक स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावरून कळत होते की, पलाश स्मृती मानधना हिला धोका देत आहे. आता थेट स्मृती मानधना हिने पोस्ट शेअर करत लग्न रद्द केल्याचे जाहीर केलं.











