क्रिडा विश्वातून क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आशिया कप स्पर्धेकडे सर्व क्रिकेट प्रेमींची डोळे अलीकडे लागून राहिल होते. अशा परिस्थितीत आता मोठी बातमी समोर येतीय… सप्टेंबर 2025 म्हणजे पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल की सूर्यकुमार यादव? सा सर्वांनाच प्रश्न पडला होता. मात्र, सूर्यकुमार यादव हा आशिया कपमध्ये भारताचा कर्णधार असणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींच्या मनातील मोठ्या प्रश्नाचे उत्तर या निमित्ताने मिळाले आहे.
सुर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी
भारताचा टी-20 चा कर्णधार सूर्यकुमार यादव हा पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. म्हणूनच आशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व कोण करेल? याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र, आता याबद्दल घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव हाच आशिया कपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. अशिया कप स्पर्धा ही आशियाई क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने अद्याप या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. यामागील कारण सूर्यकुमार यादव तंदुरुस्त नसणे हे आहे. अमात्र, अशातच बीसीसीआयने भारतीय संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवच्या नावाची घोषणा केली आहे. शुभमन गिल भविष्यात निश्चितच भारतीय संघाचा कर्णधार असेल, पण, 2026 च्या टी20 विश्वचषकानंतरच त्याला टी20 मध्ये कर्णधारपद मिळेल असं बोललं जात आहे.
लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार!
याबाबत संघाची घोषणा कधी होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्याबाबत देखील मोठी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव तंदुरुस्त झाला आहे. त्याने एनसीएमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. सूर्याच्या तंदुरुस्तीची अधिकृत माहिती काही दिवसांत येईल. 2025 च्या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी बीसीसीआय 2025 च्या आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. भारत गेल्या एक वर्षापासून टी-20 मध्ये वेगळ्या संघासोबत खेळत आहे. काही खेळाडूंनी त्यात चांगली कामगिरी देखील केली आहे. अशा परिस्थितीत, भारतीय व्यवस्थापन गेल्या एक वर्षात भारतासाठी टी-२० क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंवर विश्वास दाखवू शकते.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह. यामध्ये आगामी काळात नेमके कसे बदल केले जातात, यावर टीम इंडियाचे अंतिम चित्र अवलंबून असणार आहे.





