ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर आता कसोटी सामन्यांचा थरार, भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. तथापि, टीम इंडियाने कांगारूंना २-१ ने हरवून टी-२० मालिकेतील विजयाचा बदला घेतला. आता, भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भारत दौरा १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल. दोन्ही संघ दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळतील. येथे, भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक पाहूया.

१४ नंबर पासून सुरू होणारी टेस्ट मालिका

१४ नोव्हेंबरपासून भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सध्याची चॅम्पियन दक्षिण आफ्रिकाविरुद्ध २ टेस्ट मॅचची मालिका सुरू होत आहे. पहिला टेस्ट १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. दुसरा टेस्ट २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीत खेळला जाईल.

पहिला टेस्ट: १४–१८ नोव्हेंबर – कोलकाता
दुसरा टेस्ट: २२–२६ नोव्हेंबर – गुवाहाटी

३ ODI मॅचेसची मालिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत खेळली जाईल. पहिला सामना ३० नोव्हेंबर रोजी राँचीमध्ये होणार आहे. दुसरा ODI सामना ३ डिसेंबर रोजी रायपूरमध्ये आणि मालिकेचा शेवटचा सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापत्तनममध्ये होईल.

पहिला वनडे: ३० नोव्हेंबर – राँची
दुसरा वनडे: ३ डिसेंबर – रायपूर
तिसरा वनडे: ६ डिसेंबर – विशाखापत्तनम

पाच टी-२० सामन्यांची मालिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका ९ डिसेंबरपासून सुरू होईल आणि १९ डिसेंबर रोजी संपेल. पहिला सामना कटकमध्ये, दुसरा चंदीगडमध्ये, तिसरा धर्मशालामध्ये आणि चौथा लखनौमध्ये खेळला जाईल. टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल.

पहिली टी20 मालिका: ९ डिसेंबर – कटक
दुसरी टी20 मालिका: ११ डिसेंबर – चंदीगड
तिसरी टी20 मालिका: १४ डिसेंबर – धर्मशाळा
चौथी टी20 मालिका: १७ डिसेंबर – लखनौ
पाचवी टी20 मालिका: १९ डिसेंबर – अहमदाबाद


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News