Divya Deshmukh – आज क्रीडा विश्वातून भारतासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे महिला बुद्धिबळ वर्ल्ड स्पर्धेत नागपूरच्या दिव्या विजेती ठरली आहे. इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे भारताच्याच कोनेरू हंपीला पराभूत करत तिने हा किताब आपल्या नावावर केला आहे. दिव्याने इतिहास रचल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिव्याचा कसा आहे प्रवास? पाहूया…
कोण आहे दिव्या देशमुख ?
- दिव्या देशमुख ही महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील रहिवासी आहे.
- ती एक महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आहे.
- रॅपिड फॉरमॅटमध्ये तिच्या आक्रमक आणि निडर शैलीसाठी ती विशेष ओळखली जाते.
- अत्यंत तरुण वयात तिने बुद्धिबळात जे यश मिळवलं आहे
- दिव्या ही नागपूरच्या भवन्स शाळेची विद्यार्थिनी आहे.
- तिने 2012 मध्ये सात वर्षांखालील गटात पहिले ‘नॅशनल टायटल’ जिंकले होते.
- दिव्याने बुद्धिबळातील प्रतिष्ठेच महिला ‘फिडेमास्टर’ हा किताबही आपल्या नावे केला.
- दिव्याचे आईवडील डॉक्टर तर मोठ्या बहिणीला बॅडमिंटनची आवड आहे.
- दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत डॉक्टर म्हणून कार्यरत आहे
मला आता बोलणं कठीण
विजयानंतर दिव्या देशमुखनं दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, “मला आता बोलणं कठीण आहे. अजून बरंच काही साध्य करायचं आहे, ही फक्त सुरुवात आहे.” त्यामुळे दिव्याची ही प्रतिक्रिया भविष्यातील तिची महत्वाकांक्षा अधोरेखित करते.





