भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल याने डिसेंबर २०२० मध्ये कोरियोग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर धनश्री वर्मासोबत लग्न केलं, यानंतर जून २०२२ मध्ये दोघे विभक्त झाले आणि मार्च २०२५ मध्ये सहमतीने कायदेशीरपणे त्यांचा घटस्फोट झाला. या वर्षाच्या सुरुवातीला अशीही बातमी आली होती की, धनश्रीने ६० कोटींची पोटगी मागितली होती. मात्र धनश्रीच्या कुटुंबीयांनी ही बाब नाकारली होती. आता धनश्री एक रिअॅलिटी शो राइज अँड फॉलमध्ये सहभागी होत आहे. यातील एका एपिसोडमध्ये धनश्रीने आपल्या घटस्फोटाबाबत मोठा खुलासा केला, ज्यामध्ये तिने सांगितलं की, चहलकडून ६० कोटींची पोटगीची मागणी पूर्णपणे निराधार होती.
मी सर्वांसमोर स्पष्टीकरण का देऊ?
या रिअॅलिटी शोमध्ये आदित्य नारायणने तिला विचारले तुझ्या घटस्फोटाला किती काळ झालाय, यावर धनश्री म्हणाली, अधिकृतपणे एक वर्ष पूर्ण झालंय, कुब्रा सैतने यावर प्रत्युत्तर दिलं, की हा घटस्फोट खूप लवकर झालाय. ज्यावर धनश्री म्हणाली, हा लवकर झाला कारण आमचा घटस्फोट सहमतीने झाला. सहमतीने झाला असल्याकारणाने यात पोटगीचा प्रश्नच येत नाही. मी काही बोलच नाही, तर याचा अर्थ कुणी काहीही बोलेल असा होत नाही. मला सर्वांसमोर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असं मला वाटतं, आणि हेच मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलं आहे.

View this post on Instagram
आता कोणालाही डेट करणं कठीण..
नयनदीप रक्षितने तिला पुढे विचारलं, पोटगीबाबत ती यापूर्वी काहीच का बोलली नाही. यावर धनश्री मला, असं काही पाहिलं की खूप त्रास होतो. पण जे काही घडलं त्याची गरज नव्हती. त्यात काहीही सत्य नाही. मात्र काहीही झालं तरी मी कायम त्यांचा सन्मान ठेवेन. आता मला वाटतं नाही की मी कोणाला डेट करू शकेन.











