विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत 1,000 वर्ष जुन्या मंदिरात दर्शनाला, प्रार्थना केली आणि…

Rohit Shinde

अयोध्या: विराट कोहलीने नुकताच कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यानंतर, तो भक्तीभावात अधिक मग्न असल्याचे आढळून येते. अलीकडेच, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर, कोहली दाम्पत्य आता अयोध्येत पोहोचले आहे. जिथे तो त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत जवळजवळ १००० वर्षे जुन्या हनुमान गढी मंदिरात पूजा करताना दिसतोय.

व्हिडिओ आला समोर

याबाबतचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये मंदिराचे पुजारी त्यांना विधीनुसार पूजा विधी करायला लावत आहेत. या काळात, 
तो मोठ्या गांभीर्याने भक्तीत मग्न असल्याचेही दिसून आले. या स्टार फलंदाजाने मंदिरात नतमस्तक होऊन देवाचे आशीर्वादही घेतले. पूजा 
झाल्यानंतर विराटने मंदिर परिसरात पत्नी अनुष्कासोबत काही वेळ घालवला.

कोहली भक्तिभावात दंग

कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर चाहत्यांना विराट कोहलीचं हे वेगळं रूप पाहायला मिळत आहे,विराट कोहलीचा हा धार्मिक प्रवास कार्यक्रम अतिशय गोपनीय ठेवण्यात आला होता आणि मीडिया पोहोचल्यानंतर मीडिया कर्मचाऱ्यांना त्याच्यापासून दूर ठेवण्यात आले होते. यामुळेच कोहलीने माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही आणि संतांचे आशीर्वाद घेतल्यानंतर तो परत गेला.

ताज्या बातम्या