Virat Kohli Visits Simachalam Temple : नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेत भारताने 2- 1 असा विजय मिळवला. रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली या मालिकेचा शिल्पकार ठरला. एकूण 3 सामन्यांच्या या मालिकेत विराटने 2 शतके आणि 1 नाबाद अर्धशतक ठोकून आपलं नाणं अजूनही खणखणीत आहे हे सर्वांना दाखवून दिले. या मालिकावीज यानंतर विराट कोहली थेट एका मंदिरात पोहोचला आणि देवाचे आशीर्वाद घेतले.
विराट कोणत्या मंदिरात गेला?? Virat Kohli Visits Simachalam Temple
मालिका विजयानंतर विराट कोहली शनिवारी आंध्र प्रदेशातील सिंहाचलम टेकडीवरील प्रसिद्ध मंदिरात पोहोचला. हे मंदिर भगवान विष्णूंच्या “वराह-नरसिंह” रूपाला समर्पित आहे. ‘सिंहाचल’ शब्दाचा अर्थ सिंहाचा पर्वत. हे स्थान प्रभु नृसिंहाच्या निवासस्थान मानले जाते. विराट कोहली या मंदिरात पोहोचला आणि त्याचे फोटोज आणि व्हिडिओज वाऱ्यासारखे पसरले. वायरल फोटोमध्ये विराट पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत असून तो विष्णूंची भक्ती करताना दिसतोय. Virat Kohli Visits Simachalam Temple

सिंहाचलम टेकडीवरील मंदिर म्हणजे वराह लक्ष्मी नरसिंह मंदिर, जे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून सुमारे १६ किमी अंतरावर असून, तेथील शिल्पकला आणि ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या वराह-नरसिंह अवताराला समर्पित आहे. या मंदिराची खास बाब म्हणजे वर्षातून फक्त एकदा, अक्षय तृतीयेच्या दिवशी मूर्तीवरील चंदन लेप काढल्यावरच भगवान नरसिंहाचे मूळ रूप दिसते, अन्यथा ती मूर्ती चंदन लेपात झाकलेली असते.
विराट सुपर फॉर्मात
दरम्यान खूप वर्षानंतर विराट कोहली सुपर डुपर फार्मात आला आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेतील तीनही सामन्यात कोहलीने अप्रतिम अशी कामगिरी केली. पहिल्या वनडेमध्ये त्याने 135 धावा ठोकल्या, दुसऱ्या वनडेमध्ये 102 धावा काढल्या तर तिसऱ्या वनडेमध्ये 45 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या. एकूण 3 सामन्यात 302 धावा करत विराटला प्लेयर ऑफ द सीरिजचा मानकरी ठरला. महत्त्वाची बाब म्हणजे कोहली ज्याप्रमाणे खेळत होता तो खेळ बघता जुना कोहली सर्वांना पाहायला मिळाला. विराटचा फिटनेस, एक एक धावासाठी त्याची भूक आणि अधून मधून मारलेले आक्रमक फटके भारतीय क्रिकेट प्रेमींना नवा आनंद देऊन गेले.











