महिला टी-२० क्रिकेटसाठी सर्वात मोठे व्यासपीठ असलेले महिला प्रीमियर लीग २०२६ (WPL २०२६) पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. बीसीसीआयने शनिवारी संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले, ज्याची सुरुवात शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI विरुद्ध RCB) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याने होईल. २२ सामन्यांच्या या लीगचा समारोप ५ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम सामन्याने होईल.
या दोन शहरांना यजमानपद
WPL २०२६ या वर्षी, ही स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये खेळवली जाईल. पहिले ११ सामने नवी मुंबईत खेळवले जातील, तर उर्वरित सामने वडोदरा येथे खेळवले जातील.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स या पाच WPL फ्रँचायझींनी त्यांची तयारी तीव्र केली आहे. यावेळी प्रत्येक संघ विजेतेपद जिंकण्याचे ध्येय ठेवून आहे.
WPL २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक
१. ९ जानेवारी (शुक्रवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, नवी मुंबई
२. १० जानेवारी (शनिवार) – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
३. १० जानेवारी (शनिवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई
४. ११ जानेवारी (रविवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
५. १२ जानेवारी (सोमवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स, नवी मुंबई
६. १३ जानेवारी (मंगळवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
७. १४ जानेवारी (बुधवार) – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई
८. १५ जानेवारी (गुरुवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, नवी मुंबई
९. १६ जानेवारी (शुक्रवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१०. १७ जानेवारी (शनिवार) – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, नवी मुंबई
११. १७ जानेवारी (शनिवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, नवी मुंबई
१२. १९ जानेवारी (सोमवार) – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वडोदरा
१३. २० जानेवारी (मंगळवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
१४. २२ जानेवारी (गुरुवार) – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, वडोदरा
१५. २४ जानेवारी (शनिवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा
१६. २६ जानेवारी (सोमवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
१७. २७ जानेवारी (मंगळवार) – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा
१८. २९ जानेवारी (गुरुवार) – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वडोदरा
१९. ३० जानेवारी (शुक्रवार) – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
२०. १ फेब्रुवारी (रविवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, वडोदरा
२१. ३ फेब्रुवारी (मंगळवार) – एलिमिनेटर, वडोदरा
२२. ५ फेब्रुवारी (गुरुवार) – अंतिम सामना, वडोदरा











