मुंबई: आज म्हणजेच 29 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रचंड प्रभाव दिसून येतोय. भारतीय हवामान विभागाने (IMD) ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता, ज्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली.
कुठे किती तापमान?
मुंबईतील कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 39.1°C तापमान नोंदवले गेले, हा या हंगामातील दुसरा सर्वात उष्ण दिवस ठरला. सांताक्रूझमध्येही तापमान 35.2°C पर्यंत पोहोचले. नाशिकमध्ये 41°C, पुण्यात 42°C, औरंगाबादमध्ये 43°C, सोलापूरमध्ये 42°C आणि जळगावमध्ये 46°C तापमान नोंदवले गेले. ताुपमानाचे हे आकडे धक्कादायक असल्याचं म्हटलं जात आहे.

उष्णतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, हलके आणि सुती कपडे घालणे, आणि दुपारी बाहेर पडताना छत्री किंवा टोपी वापरण्याची सूचना केली आहे. उष्णतेच्या या लाटेचा प्रभाव आज दिवसभर कायम राहिलं.
अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायड्रेशन आणि थकवा यांचा धोका वाढतो. त्यामुळे उष्णतेपासून संरक्षणासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्या, थंड पेये घ्या. शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. बाहेर जाताना टोपी, छत्री वापरा आणि डोळ्यांसाठी गॉगल लावा. हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे घालावेत. उन्हात काम करताना वेळोवेळी विश्रांती घ्या. उन्हाच्या लाटेच्या इशाऱ्यावर लक्ष ठेवा. वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घ्या. योग्य खबरदारी घेतल्यास उष्णतेपासून बचाव शक्य आहे. थंड पेये जसे की लिंबू सरबत, ताक, नारळपाणी यांचा नियमित वापर करावा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्यावी. हवामान खात्याच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवून, गरजेनुसार नियोजन करावे. शक्य असल्यास घरात राहून पंखा, कुलर किंवा एसीचा वापर करावा.
मे महिन्यात राज्यातील तापमान सरासरी राहिली असा अंदाज आहे, त्यामुळे तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.











