India Pakistan War – भारताने ऑपरेशन सेंदूर करत पाकिस्तानला काश्मीरमधील पहेलगाम येथील अतिरेकी हल्लाचा बदला घेतला आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने सर्व प्रयत्न हाणून पाडले. भारताने पाकचे हल्ले उधळून लावले. गुरुवारी रात्री भारताने पाकिस्तानमधील ११ शहरांवर हल्ला केला आहे. भारताच्या S-400 यंत्रणाने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले.
यानंतर भारताने पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये हल्ला केला. भारताने पाकिस्तानची एअर सिस्टीम नष्ट केली. त्यामुळे पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाकिस्तान पुरता घाबरला आहे.

पाकचे ड्रोन हल्ले आणि सीमाभागात ब्लॅकआऊट.
गुरुवारी पाकिस्तानने जम्मूतील ठिकाणी ड्रोन हल्ला केला. जम्मूत आकाशात अचानक ड्रोन चमकू लागले. यानंतर तातडीने सायरनचा आवाज झाला. त्यामुळं शहरात ब्लॅकआऊट करण्यात आला. गुरुवारी सांयकाळी पाकिस्तानने जम्मूसह, राजस्थानच्या जैसलमेर, पंजाबच्या होशियारपुर आणि अमृतर, गुजरातमध्ये भुज परिसरात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापासून २० किलो मीटर अतंरावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने सर्व हल्ले हाणून पाडले. तसेच रात्री सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत इंडिया गेट परिसर मोकळा करण्यात आला. जम्मू, पंजाबच्या सीमाभागात आणि गुजरातच्या सीमाभागात, राजस्थानच्या जैसलमेरच्या सीमाभागात ब्लॅकआऊट करण्यात आलं.
भारताचे ११ ठिकाणी हल्ले…
- पाकची आर्थिक राजधानी कराची
- इस्लामाबाद
- लाहोर
- रावळपिंडी
- सियालकोट
- बहावलपूर आदी पाकच्य़ा ठिकाणी भारताने हल्ले केले आहेत











