Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?? शिंदेंची सभागृहात सांगूनच टाकलं

सरकार स्थापन होऊन वर्ष उलटून गेलं तरी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळाले नाहीत. यावरूनच आज राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली

Ladki Bahin Yojana : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी आणि स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची मदत केली जाते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या काळात आम्ही लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते. आता सरकार स्थापन होऊन वर्ष उलटून गेलं तरी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळाले नाहीत. यावरूनच आज राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली. नाना पटोले यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महिलांना २१०० रुपये कधी देणार हे सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलं?

नाना पटोले आधी काय म्हणाले-

नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेतील घोळ बाहेर काढला आणि सरकारवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालेला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट देण्यात आले. अमुक-अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या गडबडीला कोण जबाबदार आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीयेत. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल, अशा शब्दात नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. तसेच २१०० रुपये तुम्ही देतो म्हणाला होता ते कधी देणार असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.Ladki Bahin Yojana

एकनाथ शिंदेंची घोषणा (Ladki Bahin Yojana)

नाना पटोले यांच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. नाना पटोले, तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलून नये. या योजनेला तुम्ही विरोध केला होता. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोणं गेलं? वडपल्लीवार हे नाना पटोले यांचा माणूस होता. तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील. तसेच आता राहिला प्रश्न तो म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार?तर आम्ही योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभही देऊ, तसेच लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News