Margashirsha Baby Names :  मार्गशीर्ष महिन्यात जन्म झालेल्या मुलींसाठी खास देवी लक्ष्मीची नावं

मार्गशीर्ष महिना सुरु झालाय. तुम्हाला जर या काळात मुलगी झाली तर तुम्ही खालील नावांचा नक्कीच विचार करु शकता.

मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिला गुरुवार. अनेक महिला गुरुवारची मनोभावे पूजा करतात. तुमच्या घरी बाळाचा जन्म जर गुरुवारी झाला असेल तर तुम्ही तुमच्या मुलींसाठी लक्ष्मीची अतिशय गोंडस नावं निवडू शकता. घरात नुकताच तान्ह्या बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही ही नावं नक्कीच ठेवू शकता.

 मार्गशीर्ष महिन्याचं धार्मिक महत्त्व

प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिले जाते. असे म्हणतात की, या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सदैव लक्ष्मी – नारायणाचा आशीर्वाद मिळतो. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.

मुलींची नावे 

  • आरना – देवी लक्ष्मीचे एक असामान्य नाव. लाट आणि महासागर असा देखील अर्थ आहे.
  • आदि लक्ष्मी – देवी लक्ष्मी श्रीनारायणाच्या पायाची सेवा करताना दिसते.
  • अंबजा – कमळाचा जन्म
  • अनिशा – प्रकाश आणि चमक असा याचा अर्थ आहे.
  • भाग्यक्षी – देवी लक्ष्मी, भाग्यवान,
  • चंदा – चंद्र
  • दीपा – दिवा
  • दित्या – प्रार्थनेचे उत्तर, लक्ष्मीचे दुसरे नाव
  • देविका – छोटी देवी
  • धृती – धैर्य, स्थिरता
  • दुती – कल्पना, देवी लक्ष्मी
  • गौरी – एक सुंदर स्त्री, देवी, पार्वती,
  • कांती – कांती हे एक सुंदर संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ सौंदर्य आणि कृपा
  • करुणा – करुण आणि प्रेम
  • क्षीरसा – देवी लक्ष्मी
  • अर्णा – अर्णा या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये “लहर किंवा महासागर” असा होतो. देवी लक्ष्मी दुधाळ महासागराच्या राजाची कन्या होती. त्यामुळे तिचे नाव अर्णा असे ठेवण्यात येते.
  • अनिशा –अनिशा हे नाव दीर्घकाळ टिकणारी ज्योत दर्शवते. हे नाव अहिंसा या शब्दाचे प्रतीकदेखील मानले जाते. अनिशा म्हणजे ‘प्रकाश’ किंवा ‘चमक’.
  • दित्या – “जो सर्व प्रार्थनांचे उत्तर देतो” त्याला देत्य म्हणतात. हे भारतीय वंशाचे हिंदू नाव आहे आणि महालक्ष्मी देवीचे दुसरे नाव आहे. दित्या म्हणजे दाता असाही त्याचा अर्थ होतो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News