मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती हा भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस आहे, जे त्रिमूर्तीचे (ब्रह्मा, विष्णू, महेश) अवतार मानले जातात. या दिवशी भक्त पहाटे पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, उपवास करतात आणि दत्ताच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करतात. सायंकाळी दत्ताचा पाळणा हलवला जातो आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्राचा जप केला जातो.
दत्त जयंतीला काय करावे
- दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी त्रिमूर्तीची मनोभावे पूजा करावी.
- या दिवशी भगवान दत्तांच्या मूर्तीची स्थापना करुन गंगाजलाने स्नान करावं.
- तसेच, देवाला फळं, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा.
- दत्तजयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी. या झाडामध्ये दत्तगुरुंचा वास असतो असे म्हणतात.
- भगवान दत्तात्रेयांची पूजा आणि नामस्मरण करावे. ‘श्री गुरुदेव दत्त’ हा मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.
- दत्त जयंतीच्या दिवशी भगवदगीतेचे पठण करणे शुभ मानले जाते. यामुळे संकटं दूर होतात असं म्हणतात. ‘गुरुचरित्र’ या ग्रंथाचे पठण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- तसेच, या दिवशी गरिबांना, गरजू व्यक्तींना दान करणं शुभ मानलं जातं.
- या दिवशी सात्त्विक आणि पौष्टिक अन्न घ्यावे.
दत्त जयंतीला काय करू नये
दत्त जयंतीच्या दिवशी वाईट सवयींपासून दूर राहावे, इतरांचा अपमान करणे किंवा वाद घालणे टाळावे, आणि तामसिक अन्नाचे सेवन करू नये. या दिवशी सात्त्विक पूजा आणि नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे.

- दत्त जयंतीच्या दिवशी मांसाहार खाणं टाळावं. या दिवशी सात्त्विक आहार घ्यावा. मांसाहार किंवा तामसिक अन्नाचे सेवन करू नये. तसेच, मद्यपान करणं अशुभ मानलं जातं.
- दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी अपशब्द वापरु नये. या दिवशी वाईट सवयी किंवा चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावे.
- तसेच, कोणत्याही व्यक्तीशी बोलताना विनाकारण वाद करु नका. कोणाशीही वाद घालणे टाळावे, कारण हा दिवस शांतता आणि भक्तीसाठी आहे.
- दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी खोटंही बोलू नये.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











