दत्तजयंतीला आवर्जून केले जाणारे पारंपरिक पदार्थ म्हणजे घेवड्याची भाजी आणि गोड भात. दत्त संप्रदायात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना घेवड्याच्या शेंगांची भाजी खूप प्रिय होती, त्यामुळे दत्तजयंतीला नैवेद्यासाठी हा पदार्थ बनवला जातो. ही भाजी सात्विक पद्धतीने (कांदा-लसूण न घालता) बनवली जाते आणि पौष्टिक असते.
साहित्य
- घेवड्याच्या शेंगा
- तेल
- मोहरी
- जिरे
- हळद
- हिरवी मिरची
- कढीपत्ता
- मीठ
- कोथिंबीर
- गूळ (पर्यायी)
कृती
- घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन, बाजूचे धागे काढून बारीक चिरून घ्या.
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घाला. जिरे तडतडल्यावर हिंग, कढीपत्ता घाला.
- आता त्यात हळद आणि हिरवी मिरची पेस्ट किंवा चिरलेल्या मिरच्या घालून परतून घ्या.
- चिरलेला घेवडा घालून चांगला मिसळून घ्या.
- चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ आणि गुळ घाला.
- घट्ट झाकण ठेवून घेवडा शिजण्यासाठी वाफ येऊ द्या. गरज वाटल्यास थोडे पाणी शिंपडा, पण भाजी कोरडी होऊ नये याची काळजी घ्या.
- घेवडा पूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करा.
- वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












