बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ; आवक आणि दर किती? जाणून घ्या !

राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या तेजीचे वातावरण पाहायला मिळत असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. दर वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये आता सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा होताना दिसत आहे. राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या तेजीचे वातावरण पाहायला मिळत असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज बाजारात दरांची स्थिती नेमकी काय ?

आजचे भाव काय? 8 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये नोंदवलेले दर पाहिले असता ही तेजी स्पष्टपणे जाणवते. नागपूर बाजार समितीत लोकल सोयाबीनची 733 क्विंटल आवक झाली. येथे कमीत कमी दर 3,800 रुपये, जास्तीत जास्त दर 4,450 रुपये, तर सर्वसाधारण दर ,287 रुपये प्रती क्विंटल इतका नोंदवण्यात आला. दुसरीकडे अकोला बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची मोठी आवक झाली असून तब्बल 3,153 क्विंटल सोयाबीन बाजारात दाखल झाले. येथे कमीत कमी दर 4,000 रुपये, जास्तीत जास्त दर 4,520 रुपये आणि सर्वसाधारण दर 4,430 रुपये प्रती क्विंटल मिळाला.

दरातील वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या तेजीचे वातावरण पाहायला मिळत असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर सोयाबीन आणि सोयाबीन तेलाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसांतच सीड क्वालिटी सोयाबीनच्या दरात जवळपास एक हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली असून, मील क्वालिटी सोयाबीनच्या दरातही मोठी उसळी दिसत आहे. यामुळे सोयाबीनचे दर लवकरच हमी भावाचा टप्पा ओलांडतील, अशी शक्यता बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटत चालली आहे. शेतकऱ्यांकडील साठा मर्यादित राहिला असून अनेक शेतकरी सध्या भाववाढीच्या अपेक्षेने माल बाजारात आणत नाहीत. याउलट प्रक्रिया उद्योग, तेल उत्पादक कंपन्या आणि व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची मागणी वाढत आहे. या मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे दराला जोरदार आधार मिळत असल्याचे चित्र आहे.

सोयाबीन उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण

यंदाच्या खरिप हंगामात सोयाबीनचा पेरा अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. पावसातील अनियमितता, उत्पादन खर्चात वाढ आणि मागील काळातील कमी दर यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी इतर पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम सध्या बाजारात दिसू लागला आहे. कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे दर वेगाने वाढत आहेत. दरम्यान, केवळ दोनच दिवसांत सोयाबीनच्या दरात दीड हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे बाजारातील व्यवहारातून स्पष्ट होत आहे. मील क्वालिटी सोयाबीनचे दरही पाच हजार रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. वाशिम बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी बिजवाई सोयाबीनला 5,800 रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा उच्चांक गाठल्याची नोंद झाली होती.


About Author

Rohit Shinde

Other Latest News