Salman Khan : सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चा फर्स्ट लुक कधी? चाहत्यांची उत्सुकता शिगेला

चित्रपटसृष्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकर्सने सलमान खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं सरप्राइज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या बर्थडेच्या दिवशीच ‘बॅटल ऑफ गलवान’चा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक अपूर्वा लखिया या दिवसासाठी विशेष तयारी करत असून सध्या पोस्ट-प्रोडक्शनची कामं वेगाने सुरू आहेत

Salman Khan : सलमान खान सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या ‘बॅटल ऑफ गलवान’च्या शूटिंग आणि पोस्ट-प्रोडक्शनमध्ये गुंतले आहेत. ‘सिकंदर’च्या निराशाजनक कामगिरीनंतर सलमानच्या पुढील चित्रपटाकडे प्रेक्षक आणि ट्रेड सर्कलचे लक्ष वेधले गेले आहे. अपूर्वा लखिया दिग्दर्शित ही बिग बजेट वॉर ड्रामा फिल्म गलवान व्हॅलीतील भारत-चीन संघर्षावर आधारित असल्याने याविषयीची अपेक्षाही अधिक वाढली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट?

चित्रपटसृष्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकर्सने सलमान खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं सरप्राइज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या बर्थडेच्या दिवशीच ‘बॅटल ऑफ गलवान’चा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक अपूर्वा लखिया या दिवसासाठी विशेष तयारी करत असून सध्या पोस्ट-प्रोडक्शनची कामं वेगाने सुरू आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, फर्स्ट लुकमध्ये पारंपरिक अॅक्शन सीनऐवजी भावनिक आणि वास्तवदर्शी क्षण दाखवले जातील, ज्याद्वारे प्रेक्षकांना गलवानच्या संघर्षाची भाषा आणि संवेदना जाणवतील. विशेष म्हणजे, सलमान खान या चित्रपटात एका रिअल लाइफ इंडियन आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहेत. Salman Khan

सलमान काय म्हणाला होता?

दरम्यान, सलमान खानने काही दिवसांपूर्वी पीटीआयशी बोलताना या चित्रपटासाठी करावी लागत असलेल्या मेहनतीबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितले, “‘बॅटल ऑफ गलवान’साठी प्रचंड फिजिकल ट्रेनिंग आणि वर्कआउटची गरज भासते आहे. सेटवर प्रत्येक दिवस माझ्यासाठी आव्हानात्मक असतो. या भूमिकेसाठी मी रोज जिममध्ये कठोर मेहनत करतो आणि पुढचे काही महिने हाच दिनक्रम ठेवणार आहे. सलमानच्या वाढदिवशी येणारा ‘बॅटल ऑफ गलवान’चा फर्स्ट लुक त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे, यात शंका नाही. आता या चित्रपटाची झलक नेमकी कधी आणि कशी येणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News