“धनंजय मुंडेंनी 2.5 कोटींची सुपारी दिली, अजितदादा पापात सहभागी होऊ नका”, मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करण्यासाठी सुपारी दिली आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी आणि धनंजय मुंडे दोघांची नार्को टेस्ट करा. अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करण्यासाठी सुपारी दिली आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी आणि धनंजय मुंडे दोघांची नार्को टेस्ट करा. धनंजय मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे. त्यांनी मैदानात यावे. मी तयार आहे, असे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील  यांनी केले. मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.

नेमकं जरांगेंच्या हत्येच्या कटाचं प्रकरण काय?

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला आणि दोन आरोपींना ताब्यात घेतलं. दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, एका मोठ्या राजकीय नेत्याने जरांगे पाटील यांना संपवण्याचा हा कट रचल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे. त्यामुळे तपासाअंती धनंजय मुंडेंचे नाव समोर येते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंडे टार्गेटवर; जरांगेंचा अजित पवारांना इशारा

धनंजय मुंडे यांना मला ठार मारायचे आहे. पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. तरीही जालना पोलीस आणि गृहमंत्रालयाने धनंजय मुंडे यांना अटक का केली नाही किंवा त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. माझ्या कोर्टात सिध्द झालंय . धन्याने माझी 2.5 कोटींची सुपारी दिली आहे. मी पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. फडणवीससुध्दा त्याला सांभाळत आहेत. क्रुर माणसाला सांभाळू नका . पहिले देवेंद्र फडणवीस असे नव्हते. हे चांगलं नाही. ते क्रुर माणसांना पाठिंबा देत आहेत. फडणवीस पूर्वीसारखे वागले तर गरिबांना न्याय मिळेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.


About Author

Rohit Shinde

Other Latest News