उपवास म्हंटल कि आपल्या प्रत्येकाच्या घरात साबुदाणा खिचडी बनवलेली असते. त्यात साबुदाणा खिचडी ही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडीची डिश आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना साबुदाणा खिचडी आवडते. कारण साबुदाण्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जात असून या बनवलेल्या पदार्थांची स्वतःची एक वेगळीच चव असते. आज आम्ही तुम्हाला साबुदाणा वड्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साबुदाणा वडे कसे बनवायचे…
साहित्य
- साबुदाणा
- उकडलेले बटाटे
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- शेंगदाण्याचे कुट
- काळी मिरी
- तूप
- सैंधव मीठ
कृती
- कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा धुऊन स्वच्छ करून घ्या. आता हा साबुदाणा साधारण दीड वाटी स्वच्छ पाण्यात भिजवून २ तास फुलण्यासाठी ठेवा.
- २ तासांनंतर साबुदाणामधील जास्तीचे पाणी काढून टाका. यानंतर उकडलेले बटाटे सोलून घ्या. ते मॅश करून साबुदाण्यामध्ये मिक्स करा. हे एकत्र चांगले मॅश करा.
- आता त्यात सैंधव मीठ, काळी मिरी पावडर, हिरवी मिरची आणि बारीक केलेले शेंगदाण्याचे कुट घाला. हे सर्व चांगले मिक्स करा.
- तळहाताला थोडे तेल लावून वड्याचे मिश्रण घेऊन गोलाकार करा आणि नंतर तळहाताने थोडे चपटा आकार करा. अशाप्रकारे सर्व वडे तयार करून घ्या.
- आता एका सपाट तळाच्या कढई किंवा पॅनमध्ये तूप टाकून गॅसवर ठेवा. तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. हे गरम झाल्यावर त्यात तयार केलेले वडे टाका.
- कढई किंवा पॅनच्या आकारानुसार ४-५ वडे एका वेळी टाकू शकता. आता हे वडे दोन्ही बाजूने सोनेरी तपकिरी होईपर्यंत नीट तळून घ्या.
- हे वडे क्रिस्पी होण्यासाठी गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. तुमचा साबुदाणा वडा तयार आहे.
- दही किंवा चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.
यंदाच्या एकादशीला साबुदाणा खिचडी, वरई यांसारख्या नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त हे काहीसे हटके पदार्थ नक्की ट्राय करुन पहा.





