दत्त जयंतीनिमित्त नैवेद्यासाठी सुंठवडा हा पारंपरिक प्रसाद दिला जातो, दत्त जयंतीच्या नैवेद्यासाठी सुंठवडा हा एक पारंपरिक पदार्थ आहे, जो हिवाळ्यामध्ये आरोग्यदायी आणि पौष्टिक असल्यामुळे दिला जातो. हा सुंठवडा सुक्या मेव्याचे आणि इतर साहित्याचे मिश्रण आहे, जे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते आणि सर्दी व पचनक्रियेच्या समस्यांपासून बचाव करते.
सुंठवडा तयार करण्याची पारंपरिक पद्धत
साहित्य
- सुंठवड्यासाठी 200 ग्रॅम खोबरं
- १०० ग्रॅम खारीक
- २५-२५ ग्रॅम काजू
- बदाम, पिस्ता, मनुका
- एक चमचा सुंठ पावडर किंवा तुकडा
- एक चमचा बडीशेप
- एक चमचा ओवा, दोन चमचे धने
- एक चमचा तीळ
- १०० ग्रॅम साखर
कृती
- आधी कढईमध्ये सर्व सुखा मेवा हलकासा भाजून घ्यायचा आहे. सर्वात आधी खारीख भाजून घ्यायचे आहे.
- त्यानंतर बदाम, काजू, बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, सोललेली वेलची, सुख्या खोबऱ्याचा किस हे सर्व कढईमध्ये एक एक करुन भाजून घ्या.
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम सोडून बाकी सर्व सुकामेवा टाकून त्यामध्ये तीन चमचे साखर आणि एक चमचा खडी साखर टाकून वाटून घ्यायचे आहे.
- त्यानंतर आता यामध्ये खोबऱ्याचा किस, काजू, बदाम आणि सुंठ पावडर टाकून पुन्हा मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करुन घ्यायचे आहे.
- एका तयार भांड्यात सुंठवडा घ्या.
- दत्त जयंतीच्या दिवशी हा सुंठवडा नैवेद्य म्हणून दाखवा.
- खाताना एकाच वेळी जास्त प्रमाणात न खाता, चिमूटभर घ्या जेणेकरून ठसका लागणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












