मार्गशीर्ष महिना पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करण्यात येते. महाराष्ट्रात दत्त जयंतीचा मोठा उत्साह पाहिला मिळतो.
दत्त जयंतीचे महत्त्व
हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप मानले जाते. २०२५ मध्ये दत्त जयंती गुरुवारी येत असल्याने, हा दिवस दत्तगुरूंची पूजा आणि नामस्मरणासाठी अधिक शुभ मानला जातो. दत्त जयंतीनिमित्त भक्त त्यांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करतात, स्तोत्रपठण करतात आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्राचा जप करतात.

कधी आहे दत्त जयंती ?
पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजून 38 मिनिटांनी सुरु होईल आणि 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 4 वाजून 44 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार गुरुवारी 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.
दत्तजयंती पूजाविधी
- दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी.
- त्यानंतर दत्तात्रेय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करा.
- पूजा करताना मूर्तीचा तुम्ही अभिषेक करा.
- त्यानंतर अष्टगंध लावून हार फुले अर्पण करा.
- धूप,अगरबत्ती आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा.
- यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नामजप करा.
- दत्त बावनी,गुरुचरित्र वाचा.
- गुरुलीलामृत, स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदयातील ग्रंथ वाचा.
- त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.
- दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा कोणतीही पिवळी मिठाई, फळे देखील तुम्ही नैवेद्यात दाखवू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











