हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप मानले जाते. २०२५ मध्ये दत्त जयंती गुरुवारी येत असल्याने, हा दिवस दत्तगुरूंची पूजा आणि नामस्मरणासाठी अधिक शुभ मानला जातो. दत्त जयंतीनिमित्त भक्त त्यांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करतात, स्तोत्रपठण करतात आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्राचा जप करतात.
कधी आहे दत्त जयंती ?
पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजून 38 मिनिटांनी सुरु होईल आणि 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 4 वाजून 44 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार गुरुवारी 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.

दत्तजयंती सायंकाळी सहा वाजता का साजरी केली जाते?
मार्गशीर्ष महिना सुरु झाला की, वेध लागतात ते दत्त जयंतीचे. गुरुवारी 4 डिसेंबर रोजी श्री गुरुदेव दत्त यांची जयंती साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त गुरुंचा जन्म झाला. दत्तजयंती सायंकाळी ६ वाजता साजरी केली जाते कारण पौराणीक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रेय यांचा जन्म याच ‘गोरज मुहूर्ता’वर झाला होता. दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते, आणि याच दिवशी सायंकाळी सुमारे ६:३० ते ६:४० या वेळेला दत्तजन्मोत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी हा जन्मोत्सव ‘प्रदोषकाली’ साजरा करण्याची परंपरा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











