गीता हा एक जीवन ग्रंथ आहे. गीता हा एकमेव ग्रंथ असावा ज्याची जयंती साजरी केली जाते. या जयंती निमित्त आपल्या प्रियजनांना द्या या खास शुभेच्छा!
गीता जयंतीचे धार्मिक महत्त्व
गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येते, म्हणून या दिवसाला ‘मोक्षदा एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने मोक्षप्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गीतेमध्ये कर्म, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांसारख्या जीवनाच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंवर मार्गदर्शन केलेले आहे. गीतेचे पठण केल्याने जीवनातील समस्या आणि तणाव कमी होतो. यातून आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील सत्याची जाणीव होते, असे मानले जाते.

कधी आहे गीता जयंती ?
एकादशी तिथी रविवार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. आणि सोमवारी, 1 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 02 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार सोमवारी, 1 डिसेंबर 2025 रोजी गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जाईल.
गीता जयंतीनिमित्त शुभेच्छा….
गीता जयंतीचा हा शुभ प्रसंग
तुमच्या जीवनात खूप सकारात्मकता
शांती आणि सौहार्द घेऊन येवो ही प्रार्थना
गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
गीता जयंतीच्या शुभ दिवशी
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
प्रेम, आनंद, संपत्ती आणि उत्तम आरोग्य लाभो
गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
भगवद्गीतेचे ज्ञान आपल्या जीवनात
प्रकाश आणि शांती आणो, हीच सदिच्छा!
गीता जयंतीच्या या पवित्र प्रसंगी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
श्रीकृष्ण तुम्हाला कायम शुभ आशीर्वाद देवो
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
गीता जयंतीच्या या पवित्र प्रसंगी
श्रीकृष्णाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत
तुमचे हृदय आणि घर सुख, शांती, समृद्धीने भरले जावो
गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











