हिंदी दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात दोन आणि वर्षभरात 24 एकादशी असतात. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणाऱ्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. जी 1 डिसेंबर 2025 रोजी रोजी आहे. मोक्षदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाणार आहे. नैव्यद्यशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवला जातो. चला तर मग जाणून घेऊया मखाना खीरची रेसिपी….
साहित्य
- मखाना
- दूध
- साखर (चवीनुसार)
- सुकामेवा (बदाम, पिस्ता, काजू)
- वेलची पावडर (ऐच्छिक)
कृती
- एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करून मखाना खरपूस होईपर्यंत भाजा.
- एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा.
- दूध उकळल्यावर त्यात भाजलेले मखाना आणि साखर घाला.
- मंद आचेवर खीर घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
- गरम केल्यावर वेलची पावडर आणि सुकामेवा घालून सजवा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












