हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. यंदा मोक्षदा एकादशी 1 डिसेंबर 2025 रोजी साजरी केली जात आहे. मोक्षदा एकादशीला नेहमी पेक्षा हटके आणि चविष्ट असे उपवासाचे बटाटावडा करून पाहा..
साहित्य
- उकडलेले बटाटे (३-४)
- साबुदाण्याचे पीठ (१/४ कप)
- शेंगदाण्याचा कूट (१/४ कप)
- हिरव्या मिरच्यांची पेस्ट (चवीनुसार)
- मीठ (चवीनुसार)
- कोथिंबीर (ऐच्छिक)
कृती
- बटाटे उकडून त्याचे साल काढून ते पूर्णपणे मॅश करून घ्या.
- मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये उपवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जसे की साबुदाण्याचे पीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला.
- तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवा.
- दुसऱ्या भांड्यात साबुदाण्याचे पीठ आणि पाणी घेऊन पातळसर भिजवून घ्या.
- तयार केलेले गोळे या पिठात बुडवून गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- तुमचे उपवासाचे बटाटेवडे तयार आहेत. मोक्षदा एकादशीच्या उपवासासाठी याचा आस्वाद घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












