घरात पाल दिसली की अनेकजण आरडाओरड करण्यास सुरुवात करतात. अनेकदा घराच्या भिंतीवर पाल दिसते. तिला पाहताच आपल्यापैकी अनेकांना किळस येते. पण पाल घरात दिसणे शुभ असते की अशुभ जाणून घेऊयात…
पूजाघरात पाल दिसणे
शास्त्रानुसार, घरात पाल दिसणे हे साधारणपणे शुभ मानले जाते आणि विशेषतः पूजाघरात पाल दिसणे हे आर्थिक सुधारणा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार, पाल देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते, त्यामुळे घरात पाल दिसल्यास आर्थिक समस्या कमी होऊन घरात सुख-समृद्धी येते.
जमिनीवर किंवा भिंतीवर पाल दिसणे
घरात पाल जमिनीवर किंवा भिंतीवर सरपटताना दिसल्यास ते शुभ मानले जाते. घरात पाल जमिनीवर किंवा भिंतीवर सरपटताना दिसल्यास ते शुभ मानले जाते.
दोन पाली एकमेकांशी भांडताना दिसणे
शास्त्रानुसार, घरात दोन पाली एकमेकांशी भांडताना दिसणे अशुभ मानले जाते, कारण याला घरगुती त्रासाचे लक्षण समजले जाते आणि लवकरच घरात वाद किंवा भांडणे होण्याची शक्यता दर्शवते.
नवीन घरात मेलेली पाल दिसणे
नवीन घरात प्रवेश करताना मृत पाल दिसणे अशुभ मानले जाते आणि ते आजारपणाचे लक्षण मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)