Margashirsha Guruvar 2025 : मार्गशीर्ष महिन्यात काय करावे आणि काय टाळावे जाणून घ्या..

Asavari Khedekar Burumbadkar

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे. या महिन्यात दर गुरुवारी घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या महिन्यात स्नान करणे, दान करणे आणि दिवे लावणे यामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते. तसेच या महिन्यात केले जाणारे कार्य अत्यंत फलदायी असते. या मार्गशीर्ष महिन्यात काय करावं आणि काय टाळावे जाणून घेऊयात…

मार्गशीर्ष महिन्यात काय करावे

  • सकाळी लवकर उठून स्नान करणे शुभ मानले जाते.
  • या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची विशेष पूजा करावी. यामुळे भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळते असे म्हणतात.
  • या महिन्यात केलेल्या दानाचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः अन्नदान करणे खूप पुण्यदायी मानले जाते.
  • या महिन्यात घरात दिवे लावणे आणि धार्मिक ग्रंथांचे पठण करणे देखील शुभ मानले जाते. 
  • सात्विक आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

मार्गशीर्ष महिन्यात काय टाळावे

  • या महिन्यात नकारात्मक विचार टाळावेत.
  • शक्य असल्यास अनावश्यक खर्च टाळावा.
  • कोणत्याही प्राण्याचा किंवा सजीवाचा अपमान किंवा त्रास देऊ नये.
  • व्यसन आणि इतर वाईट सवयींपासून दूर राहावे. 
  • व्रत करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा.
  • हे व्रत करणार्‍यां स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे.
  • रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे.
  • पूजा करताना आणि व्रत कथा वाचताना मन शांत आणि आनंदी असावं.
  • व्रताच्या दिवशी घरातील वातावण आनंदी असावं.
  • एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे, परंतू उपवास आपणच करावा.
  • वाद भांडण करू नये. बोलताना चुकीचे शब्द वापरू नये.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या