मार्गशिष महिन्यात गुरुवारी देवीला नैवेद्य दाखवितात. त्यासाठी विविध पदार्थ बनवतात. तुम्ही या सोप्या आणि झटपट रेसिपीच्या मदतीने परफेक्ट पदार्थ बनवू शकता. तो म्हणजे नारळ पोळी. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी देवीला विविध पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात, त्यापैकी नारळ पोळी हा एक सोपा आणि चविष्ट पदार्थ आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पुरणपोळी किंवा लाह्या-फुटाणे यांसारख्या पदार्थांसोबत नारळ पोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.
साहित्य
- नारळाचा कीस
- गूळ
- वेलची
- जायफळ
- तूप
- गव्हाचे पीठ
कृती
- एका कढईत तूप टाकून घ्यायचे आहे. तूप थोडे गरम झाले की, त्यात नारळाचा किस आणि किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित तुपात मिक्स करून सुगंध येतपर्यंत भाजून घ्यायचे आहे.
- गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत मंद आचेवर शिजवा.मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घालून चांगले मिसळा.
- सारण पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे बनवा.
- गव्हाचे पीठ, थोडे मीठ आणि हळद घालून मऊसर कणिक मळून घ्या.
- कणिक १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
- कणकेचा एक गोळा घेऊन त्याची पारी बनवा.
- तयार केलेल्या सारणाचा गोळा पारीमध्ये ठेवून सर्व बाजूंनी बंद करा.
- पोळी हलक्या हाताने लाटा.
- तव्यावर पोळी सोनेरी रंगावर दोन्ही बाजूंनी तूप लावून भाजा.
- पोळी भाजल्यानंतर लगेच नैवेद्य म्हणून दाखवू शकता.
