मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना आहे आणि या महिन्यात महालक्ष्मीचे व्रत केल्याने देवीची कृपा प्राप्त होते. या व्रतामुळे घरात सुख, समृद्धी आणि वैभव येते, अशी श्रद्धा आहे. या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केल्याने देवीची विशेष कृपा लाभते. मार्गशीर्ष गुरुवारी मंत्राचा जप करणे विशेष फलदायी ठरते.
मंत्र
लक्ष्मीकांतं कमलनयनम योगिभिर्ध्यान नग्म्य्म। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्व लोकेकनाथम्।।

या मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते, असे मानले जाते. मार्गशीर्ष गुरुवारी या मंत्राचा जप करणे विशेष फलदायी ठरते.
मंत्राचा अर्थ
लक्ष्मीचांतं (लक्ष्मीचा कांत), कमलनयनम (कमळासारखे डोळे असलेला), योगिभिर्ध्यानग्म्य्म (योग्यांकडून ज्याचे ध्यान केले जाते), वन्दे विष्णुं (विष्णूला वंदन असो), भवभयहरं (संसारातील भयाचा नाश करणारा), सर्व लोकेकनाथम् (सर्व लोकांचा नाथ असलेला).
याचा अर्थ असा की, लक्ष्मीचे स्वामी, ज्यांचे डोळे कमळासारखे आहेत आणि जे योग्यांच्या ध्यानाद्वारे जाणले जातात, अशा सर्व जगाच्या मालकाला, म्हणजे भगवान विष्णूंना मी वंदन करतो, जे सर्व भीती दूर करतात.
मंत्र जपाचे फायदे
या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि गोंधळ दूर होतो. भीती, दुःख आणि चिंता यांसारख्या नकारात्मक भावना कमी होण्यास मदत होते. यामुळे आध्यात्मिक संरक्षण मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. हा मंत्र सर्व समस्या आणि संकटे दूर करणारा मानला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)