Mokshada Ekadashi 2025 : कधी आहे मोक्षदा एकादशी? जाणून घ्या महत्त्व..

Asavari Khedekar Burumbadkar

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात या एकादशीचे विशेष महत्त्व आहे.  चला तर मग मोक्षदा एकादशी कधी आहे तसेच शुभ वेळ कोणता आहे हे जाणून घेऊयात…

मोक्षदा एकादशीचे महत्त्व

मोक्षदा एकादशीचे महत्त्व हे आहे की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी ‘गीता जयंती’ देखील साजरी केली जाते, कारण महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवतगीतेचा उपदेश दिला होता. हे व्रत केल्याने केवळ वर्तमान जीवनातील दुःख कमी होत नाही, तर आपल्या पूर्वजांनाही मोक्ष मिळतो, असे मानले जाते. भगवान विष्णूची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते आणि ग्रहदोष दूर होतात. 

कधी आहे मोक्षदा एकादशी?

एकादशी तिथी 30 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी रात्री 9 वाजून 29 मिनिटांनी सुरू होईल. आणि 1 डिसेंबर 2025 रोजी सोमवारी संध्याकाळी 7 वाजून 01 मिनिटांनी संपेल. एकादशीचे व्रत उदय तिथीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी केले जाईल.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या