सफला एकादशीचे व्रत केल्यास सर्व चांगल्या कामांमध्ये यश मिळते. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला हे व्रत केले जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. चला सफला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. याबद्दल जाणून घेऊयात….
सफला एकादशीचे महत्त्व
एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ‘सफल’ म्हणजे यशस्वी, त्यामुळे या दिवशी केलेले व्रत सर्व कार्यांमध्ये यश मिळवून देते. कामातील अडथळे दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळतं, तसेच आर्थिक लाभही होतो.
सफला एकादशीच्या दिवशी काय करावे
- भगवान विष्णू, श्रीकृष्णाची आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी.
- विष्णूची पूजा करावी, मंत्रांचा जप करावा आणि तुळस अर्पण करावी.
- विष्णूला उसाच्या रसाने अभिषेक करणे शुभ मानले जाते.
- रात्री भजन-कीर्तन करून जागरण करणे महत्त्वाचे आहे.
- अन्न, कपडे, ब्लँकेट, फळे, धान्य यांचे दान करावे, असे केल्याने पुण्य मिळते.
- सफला एकादशीची व्रत कथा वाचावी.
- दुसऱ्या दिवशी (द्वादशीला) योग्य मुहूर्तावर उपवास सोडणे (पारण करणे) आवश्यक आहे.
सफला एकादशीच्या दिवशी काय करू नये
- या दिवशी मांसाहार टाळावा आणि तामसिक अन्न खाऊ नये. या दिवशी कांदा-लसूण आणि मांसाहार वर्ज्य असतो, तसेच मद्यपान पूर्णपणे टाळावे.
- खोटे बोलू नये आणि वादविवाद टाळावेत. कोणाशीही खोटे बोलू नये, वाईट विचार करू नयेत आणि शिवीगाळ टाळावी.
- इतरांची निंदा करणे किंवा नकारात्मक चर्चा करणे टाळावे. रागावर नियंत्रण ठेवावे, लोभ आणि अहंकारापासून दूर राहावे.
- शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करावे.
- आळस करणे टाळावे आणि उत्साहाने पूजा करावी.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





