पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी सफला एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते. यावेळी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. सफला एकादशी कधी आहे, पूजेसाठी मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात….
सफला एकादशीचे महत्त्व
सफला एकादशीच्या व्रतामुळे जीवनातील सर्व कार्यांमध्ये यश आणि प्रगती मिळते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच भक्त यशाच्या इच्छेने हे व्रत करतात. सफला एकादशीचे व्रत केल्याने पापांचा क्षय होतो आणि मोठे पुण्य मिळते, असे मानले जाते. विधीवत पूजा आणि उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.
सफला एकादशी पूजेसाठी मुहूर्त
पंचांगानुसार सफला एकादशी 15 डिसेंबरला सोमवारी आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी 14 डिसेंबर रोजी रात्री संध्याकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी सुरू झाली असून , 15 डिसेंबर रोजी रात्री रात्री 9 वाजून 19 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार सफला एकादशीचा उपवास 15 डिसेंबर रोजीच केला जाईल.
सफला एकादशीची पूजा कशी करायची
- ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा.
- भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा.
- ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा.
- फुले, फळे (विशेषतः केळी), तुळस, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा.
- दिवसभर फलाहार करा किंवा शक्य असल्यास निराहार राहा.
- गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करा.
- दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणभोजन देऊन किंवा दानधर्म करून उपवास सोडणे (पारण) महत्त्वाचे आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





