प्राचीन भारतात चाणक्य (Chanakya Niti) हे एक महान विद्वान, राजनीती आणि नीतिशास्त्रातील तज्ञ मानले जातात. ते केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते तर त्यांना जीवन जगण्याचे, नोकरी आणि व्यवसायाचे सखोल ज्ञान होते. आचार्य चाणक्यांनी आपल्या ‘नीतिशास्त्र’ या ग्रंथामध्ये जीवनातील विविध गोष्टींबाबत सल्ले दिले आहेत. आजकालच्या या स्वार्थी जगात माणसे कशी ओळखायची?? याबाबत सुद्धा आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती मध्ये सांगितले आहे.
काय म्हणतात चाणक्य? Chanakya Niti
फसवणारे आणि स्वार्थी लोक तुमच्या समोर तुमची प्रशंसा करतात, गोड गोड बोलतात पण तुमच्या माघारी तुमच्याबद्दल वाईट बोलतात. खरे मित्र ते असतात जे कठीण किंवा गैरसोयीचे असतानाही सत्य बोलतात.

एखाद्या व्यक्तीचे खरे चारित्र्य त्यांच्या कृतीतून दिसून येते. खरा मित्र तो असतो जो कठीण काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो. परंतु जो अडचणीच्या काळात साथ सोडतो तो कधीच आपला नसतो.
एखाद्याच्या प्रामाणिकपणाची चाचणी घेण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना एक छोटीशी जबाबदारी किंवा काम देणे. त्यांच्या वागण्याने त्यांचे खरे स्वरूप उघड होईल. जर तो तुम्हांला चांगल मानत असेल तर नक्कीच तुमचं काम करेल, परंतु त्याला तुमच्या बद्दल चांगले वाटत नसेल तर किरकिर करेल.
कमकुवत पणाचा फायदा घेतात
फसवणूक करणारी माणसे तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेतात. मानसिक शक्ती राखण्यासाठी आणि तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानसिक, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत असणे तुम्हाला फसव्या लोकांपासून सुरक्षित ठेवते असे आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीति मध्ये सांगीतले आहे.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











