दत्त जयंतीसाठी गव्हाच्या पिठाचा शिरा हा एक पारंपरिक पदार्थ आहे, जो गुळ आणि गव्हाचे पीठ वापरून बनवला जातो. हा गोड पदार्थ पौष्टिक आणि चविष्ट असून तो नैवेद्यासाठी खास बनवला जातो.
साहित्य
- १ कप गव्हाचे पीठ
- १ कप गूळ
- १ कप तूप
- १ कप पाणी
- काजूचे काप
- मनुका
- वेलची पावडर
कृती
- एका पॅनमध्ये २ चमचे तूप गरम करून त्यात काजूचे काप आणि मनुका तळून घ्या.
- त्याच पॅनमध्ये गव्हाचे पीठ घाला आणि मंद आचेवर चांगले भाजा.
- पिठात गुठळ्या होऊ नयेत म्हणून हळूहळू पाणी आणि गूळ घालत राहा.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि शिरा तूप सोडेपर्यंत शिजवा.
- गॅस बंद करून त्यात वेलची पावडर, तळलेले काजू आणि मनुका घालून चांगले मिसळा.
- गरम शिरा दत्त जयंतीच्या नैवेद्यासाठी सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












