MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

Shravan 2025 : यंदा श्रावण महिन्यात किती सोमवार आणि कोणती शिवमूठ अर्पण करावी?

सोमवार हा महादेवाला समर्पित आहे. त्यात श्रावण हा भगवान शंकराचा प्रिय महिना असल्याने या मासामधील सोमवारला अतिशय महत्त्व असतं.
Shravan 2025 : यंदा श्रावण महिन्यात किती सोमवार आणि कोणती शिवमूठ अर्पण करावी?

श्रावणात महादेवांची पूजा भक्त मोठ्या भक्तीभावाने करत असतात. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. श्रावण महिना पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावे पूजा शिवभक्त करतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं. त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात. यंदा  किती श्रावणी सोमवार आणि कोणती शिवमूठ अर्पण करावी याबद्दल जाणून घेऊयात…

यंदा श्रावणी सोमवार किती?

यंदा श्रावणात 4 श्रावणी सोमवारचं व्रत असणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा असून शिवामूठ म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या.

श्रावणी सोमवार : 28 जुलै 2025

श्रावणी सोमवार : 4 ऑगस्ट 2025

श्रावणी सोमवार : 11 ऑगस्ट 2025

श्रावणी सोमवार : 18 ऑगस्ट 2025

श्रावणातच शिवामूठ का वाहिली जाते ?

श्रावण महिना भगवान शंकराचा प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात शंकराची विशेष पूजा केली जाते. याच महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला येतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे, या महिन्यात शिवामूठ अर्पण करणे शुभ मानले जाते. या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या कृपेसाठी शिवामूठ अर्पण केली जाते. 

शिवामूठ म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वनस्पती आणि धान्यातून एक विशेष सकारात्मक ऊर्जा आपल्या मिळत असते. शिवामूठ वाहिल्याने दोष दूर होण्यास फायदा होतो. कर्जमुक्ती होते,  शांती आणि समृद्धी प्राप्त होते.

पहिला सोमवार :    28 जुलै 2025   – शिवामूठ – तांदूळ
दुसरा सोमवार  :    4 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – तीळ
तिसरा सोमवार :  11 ऑगस्ट 2025    शिवामूठ – मूग
चौथा सोमवार   :  18 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – जव

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)